इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक ११ गिर्यारोहकांनी जीव गमावला

जकार्ता

इंडोनेशियातील माऊंट मेरापी ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला. यात ११ गिर्यारोहकांका मृत्यू झाला. या ज्वालामुखीची उंची समुद्रसपाटीपासून ९८४३ फूट इतकी होती. याबाबत माहिती मिळताच इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने तेथील भागात न जाण्याचे आवाहन नागरिकांना देत सतर्कतेचा इशारा दिला.

या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचे ढग दाटले. घरांवर, वृक्षांवर, वाहनांवर आणि रस्त्यांवर राख पसरली आणि अचानक काळोख झाला. यावेळी मोठा हाहाकार माजला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाने ज्वालामुखीपासून तीन किलोमीट अंतरापर्यंत कोणीही जाऊ नये, पर्यटकांनीसुद्धा सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन केले. या परिस्थितीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक १९ वर्षीय तरुणी राखेने माखली असून, ती तिच्या आईला आर्त हाक मारत आहे. ही तरुणी ज्वालामुखीच्या उद्रेकात सापडलेल्या गिर्यारोहकांच्याच गटातील आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top