इंडिगोचे मालक गंगवाल आपले शेअर विकणार

मुंबई – इंडिगो विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे सह संस्थापक राकेश गंगवाल इंटरग्लोब अॅव्हिएशन लिमिटेड या कंपनीचे आपल्या हिश्श्यातील १२.७५ दशलक्ष समभागांची विक्री करणार आहेत.कंपनीतील त्यांच्या एकूण भागीदारीतील हे प्रमाण ३.३ टक्के आहे. या समभाग विक्रीतून ते कंपनीतील ३ हजार ७३० कोटींचे भांडवल काढून घेणार आहेत.
इंटरग्लोब अॅव्हिएशनच्या शेअरचा गुरुवारी भाव ३ हजार १०५.७ होता.या बंदभावावर ५.८ टक्के सवलत देऊन हा समभाग २ हजार ९२५ प्रतिशेअर किमतीला उपलब्ध असेल.या समभाग विक्रीमुळे कंपनीतील गंगवाल यांची भागीदारी ८.४२ टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच त्यांच्या उद्योगसमुहाची भागीदारीही कमी होणार आहे.मॉर्गन स्टॅनली, जी पी मॉर्मन आणि गोल्डमॅन सॅक्स या मध्यस्थ कंपन्या समभाग विक्रीचे व्यवस्थापन करणार आहेत.
इंडिगोचा समभाग मागील एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६७.३५ टक्क्यांनी वधारला आहे.याच वर्षात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने २३ टक्क्यांनी वधारला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top