इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ सरकारी कंपनीत निघाली 400 पदांची भरती

BHEL Recruitment 2025 : इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) इंजिनियर आणि सुपरवायझर ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जवळपास 400 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, यासाठीची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

कोणत्या पदांसाठी निघाली भरती?

BHEL ने इंजिनियर ट्रेनी पदासाठी 150 आणि सुपरवायझर ट्रेनी पदांसाठी 150 जागांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इत्यादी शाखांमध्ये शिक्षण झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे.

पात्रता

इंजिनियर ट्रेनी पदासाठी अर्ज करू इच्छित उमेदवारांकडे इंजिनियरिंगची डिग्री असावी लागेल, तर सुपरवायझर ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकडे इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा असावा. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांची वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 27 वर्ष असावे.

कधीपर्यंत करता येईल अर्ज इच्छुक उमेदवार

https://www.bhel.com/recruitment या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची तारीख 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 आहे.

अर्ज शुल्क

अर्ज करू इच्छित असणाऱ्या सामान्य (UR), ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाच्या उमेदवारांना 795 रुपये शुल्क भरावे लागेल. तर, पीडब्ल्यूडी, माजी सैनिक आणि SC/ST श्रेणीच्या उमेदवारांना 295 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवार पात्रता व अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी https://www.bhel.com/recruitment वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Tags – BHEL Recruitment 2025, Job, Vacancy Notification, BHEL

5.दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध

SSC Hall Ticket 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यात दहावीच्या परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे.

20 जानेवारीपासून सर्व माध्यमिक शाळांना www.mahahsscboard.in या वेबसाइटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळांना हॉल तिकीट डाउनलोड करून त्यावर मुख्यध्यापकांच्या सही-शिक्यासह विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत.

हॉल तिकीटमध्ये कोणतीही चूक असल्यास अथवा विद्यार्थ्यांची माहिती चुकीची असल्यास शाळांना विभागीय मंडळाशी संपर्क करता येणार आहे. तसेच, कोणतीही तांत्रिक अडचण असल्यासही विभागीय मंडळाशी संपर्क साधता येणार आहे. शाळांनी हॉल तिकीट प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये.

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक

आधिकृत वेळापत्रकानुसार, राज्यात दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून ते 17 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा दररोज दोन सत्रात पार पडले.  पहिले सत्र सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुसरे सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना हॉल तिकीटवर दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.