आशिष शेलारांचा अखेरच्या दिवशी ग्लॅमरस प्रचार

मुंबई- भाजपाचे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील उमेदवार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी आज अखेरच्या दिवशी मतदारसंघात प्रचार रॅली काढली होती. या रॅलीमध्ये मराठी सिने-टीव्ही सृष्टीतील २३ कलाकार उपस्थित होते. यात ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते अजिंक्य देव, शरद पोंक्षे, नंदेश उमप, पुष्कर श्रोत्री, वैभव तत्ववादी, आदिनाथ कोठारे, अभिजित खांडकेकर, अभिनय बेर्डे, अभिनेत्री अमृता खानविलकर, श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, विशाखा सुभेदार, दिग्दर्शक विजू माने, विनोदवीर अरुण कदम, प्रभाकर मोरे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, गौरव मोरे, सचित पाटील यांच्यासारखे कलाकार या प्रचाराच्या दौऱ्यात सहभागी होते. पुष्कर श्रोत्री हे मनसेच्या बाजूने आपली भूमिका मांडत असतात, पण भाजपा हा मनसेचा मित्र पक्ष असल्याने त्यांनी या प्रचार रॅलीला हजेरी लावली होती.