आयटीआर दाखल करण्याची शेवटची संधी, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

असेसमेंट वर्ष 2024-25 साठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 होती. मात्र, आयकर विभागाकडून आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आयकर विभागाने 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे या मुदतीच्याआधी आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल.

15 जानेवारीपर्यंत आयटीआर (ITR Filing Deadline) दाखल केल्यास?

तुम्ही जर 15 जानेवारी 2025 पर्यंत तुमचा ITR भरण्याची अंतिम तारीख चुकवल्यास, AY2024-25 चे आयटीआर दाखल करणय्ची संधी मिळणार नाही. तसेच, तुम्हाला आयकर विभागाकडून नोटिसस मिळू शकते. याशिवाय, अतिरिक्त दंड देखील भरावा लागेल.

15 जानेवारी 2025 पर्यंत विलंबित आयटीआर दाखल न केल्यास, आयकर कायद्याच्या कलम 139(8A) अंतर्गत ITR-U फाइल करता येईल. मात्र, यासाठी 5000 रुपये दंड भरावा लागेल.

विलंबित ITR ऑनलाइन कसा भरावा?

  • यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या पॅन क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करा.
  • पुढे योग्य ITR फॉर्म निवडा
  • असेसमेंट वर्ष AY2024-25 निवडा. (FY24 साठी)
  • त्यानंतर आवश्यक वैयक्तिक तपशील आणि सूट भरा. सोबतच, 5 हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.
  • त्यानंतर माहिती सबमिट करून, आधार ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करा.