आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक

काँगो- केनिया, काँगो, युगांडा आणि रवांडा यासह सुमारे १० आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्सची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा विषाणूजन्य संसर्ग सर्व आफ्रिकन देशांमध्ये आणि जगातील इतर देशांमध्ये पसरण्याची भीती आहे. जागतिक आरोग्य संघटना अधिकृत बैठकीनंतर मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित करू शकते.

मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. आफ्रिकन देशांमध्ये या वर्षी या विषाणूंच्या रुग्णांमध्ये १६० टक्के वाढ झाली आहे. मुलांना याची मोठ्या प्रमाणावर लागण होत आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, काँगोमधील सुमारे ७० रुग्ण १५ वर्षांखालील मुले आहेत. काँगोमधील मृतांमध्ये ८५ टक्के १५ वर्षांखालील मुले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेदेखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मंकीपॉक्सच्या वेगवेगळ्या प्रादुर्भावांमध्ये मृत्यू दर भिन्न आहे. अनेक वेळा तो १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने तो अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.