आता ओटीटीवर ‘राज’ करायला येतोय ‘पुष्पा 2’, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

Pushpa 2 The Rule OTT Released: अभिनेता अल्लू अर्जुनची (Allu Arjun) प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 The Rule) हा चित्रपट पाहण्यासाठी अजूनही थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत आहे. जवळपास 50 दिवस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाउसफुल राहिला असून, आतापर्यंत चित्रपटाने जगभरात 1800 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येण्याची शक्यता आहे.

हा चित्रपट थिएटरमध्ये गर्दी होत असली तरी लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा चित्रपट 30 अथवा 31 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) उपलब्ध होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे 20 मिनिटांचे अतिरिक्त व्हर्जन देखील रिलीज करण्यात आले होते. त्यामुळे आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

निर्मात्यांनी यापूर्वीच चित्रपट रिलीजनंतर 56 दिवसांनीच ओटीटीवर उपलब्ध होईल, असे म्हटले होते. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीस चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत चित्रपटाचे निर्माते किंवा नेटफ्लिक्सकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

पुष्पा-2 च्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल सांगायचे तर 5 डिसेंबरला रिलीज झाल्यापासून चित्रपटाने जगभरात 1800 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. यामध्ये अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदाना, फहाद फाजिल यांचीही प्रमुख भूमिका आहे.