आढळराव विरूध्द कोल्हे शिरूरची लढत ठरली

पुणे :

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच एक बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या तोडीस तोड उमेदवार मिळत नव्हता आणि महायुतीला ही जागा काही गमवायची नव्हती. पराभव झालेल्या दिवसांपासून आढळराव पाटील यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली होती. अखेर दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील उपस्थित होते. त्यात महायुतीचे उमेदवार म्हणून कामाला लागण्याच्या सूचना आढळराव पाटील यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील हे आता स्पष्टच झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top