आटपाडीतील करगणीच्या खिलार जनावर यात्रेत ७ कोटींची उलाढाल

सांगली- आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील ग्रामदैवत लखमेश्वर यात्रेनिमित्त भरलेल्या खिलार जनावरांच्या यात्रेत तब्बल ७ कोटींची उलाढाल झाली. १५ हजार खिलार जनावरांची नोंद बाजार समितीकडे झाली होती.

यंदाच्या यात्रेत एका बैलाची किंमत तर १५ लाखापर्यंत दिसून आली.बैलगाडा शर्यती सुरू झाल्यापासून खिलार जनावरांच्या यात्रेत मोठी उलाढाल दिसत आहे. करगणीतील यात्रेत पुणे, नगर, सातारा, अकोला, जामखेडसह कर्नाटक राज्यातील व्यापारी जनावरांच्या खरेदीसाठी आले होते.बया यात्रेच्या आधी महाशिवरात्र उत्सवात मेंढ्याची यात्रा भरली होती. त्यानंतर आता जातिवंत खिलार जनावरांची यात्रा पार पडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top