आज हरयाणा , जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल

श्रीनगर – हरयाणा व जम्मू – काश्मीर या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी आहे . त्यामुळे या दोन्ही राज्यांमधील मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या संध्याकाळ पर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल.जम्मू – काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा ३ टप्प्यात, ९० जागांसाठी ६३. ०४ टक्के इतके मतदान झाले होते. तर हरयाणात ५ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात ९० जागांसाठी ६१. ३२ टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणी आहे . जम्मू काश्मीर मध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस- एनसी आघाडी अशी लढत झाली. मेहबूबच्या पीडीपीने स्वबळावर निवडणूक लढवली होती. हरयाणात मात्र काँग्रेस, भाजपा, आम आदमी , जेजेपी अशी बहुरंगी लढत झाली. या दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top