मुंबई- उपनगरीय विभागांत रेल्वे रूळ आणि विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २२ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे.
मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद, अर्धजलद उपनगरी सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.तसेच कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद, अर्धजलद उपनगरी सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा,मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर थांबतील.तसेच ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहील. तर पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवेवर मेगाब्लॉक राहील. तसेच ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.