सिंधुदुर्ग – कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील श्री गोपाल कृष्ण मंदिर व प.पू.संत सद्गुरु श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम गुरुवार ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे.या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
तीन दिवस चालणार्या या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये गणेश पूजन, श्रीचे पादुका पूजन,श्रींची घोडशोपचार पूजा,अभिषेक,होम हवन, आरती,नैवेद्य,फुगडी, स्थानिक भजने स्थानिक भजने,नित्य आरती,किर्तन श्री गणेशा आवाहन,गणेश पूजन,कृष्ण पूजन,अभिषेक एकादशम्या,होमहवन,श्रींची आरती महाप्रसाद,दशावतार नाट्य, सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, हरिपाठ, ४ते ७ वाजेपर्यंत भजने,सांज आरती,पालखी प्रदक्षिणा,महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी आवाहन सद्गुरु श्री नामदेव महाराज भक्त मंडळ व बाळ गोपाळ मित्र मंडळाने केले आहे.