रायगड- शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि पक्षाचे जिल्हा चिटणीस माजी मंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांचे पुत्र अॅड. आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम केला आहे. त्यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आस्वाद पाटील यांच्या या निर्णयामुळे शेकापला मोठा हादरा बसला आहे. त्यांच्यासोबत शेकापची मोठी फळी पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेकाप पक्षात त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद तसेच बांधकाम सभापतीपद भूषवले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिल्याने आस्वाद पाटील व पंडित पाटील नाराज होते.