अहमदनगरमधील साई मिडास इमारतीत आग

अहमदनगर – अहमदनगरमधील सावेडी येथील साई मिडास टच या इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत इमारतीमधील एचडीबी फायनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय दवाखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

साई मिडास टच या इमारतीत आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. साई मिडास या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना आणि फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच डोळ्यांचा दवाखाना आहे. आगीत कार्यालय आणि दवाखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीमुळे इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला. काही वेळातच आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागरिकांनी गर्दी केल्यामुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top