अवकाळी पावसाने द्राक्ष-कांदा उत्पादकांची चिंता वाढली

नाशिक- द्राक्ष बागायतदारांनी कडाक्याच्या थंडीचा धसका घेतला असताना काल रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर डावण्या, भुरी, करपा रोग येण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्षाना तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली. द्राक्ष बागेत पाणी असल्यामुळे औषध फवारणी करणेही शक्य होत नाही. त्यामुळे झालेला खर्च निघेल की नाही याची देखील शेतकऱ्यांना शंका आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तर राजकीय मंडळी सत्ता स्थापनेत व्यस्त असल्यामुळे त्यांच्याकडे आमच्या प्रश्नांसाठी वेळ नसल्याची खंत द्राक्ष शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
अवकाळी पावसाने लासलगावमध्ये हजेरी लावल्यामुळे काढणीला आलेल्या लाल कांद्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top