ब्युनॉस आयर्स – जेव्हियर माइले यांनी अर्जेंटिनाचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या एक वर्षानंतर देशातील दारिद्र्यात जगणार्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार देशातील ५३ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या गरिबीत जगत आहे.परिमाणी दक्षिण अमेरिकेची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अर्जेंटिनाची अवस्था पाकिस्तानपेक्षाही बिकट झाली आहे.
१८१० मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्जेंटिनाला १९३० मध्ये आर्थिक मंदीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी लष्कराच्या धोरणांमुळे अर्जेंटिनाची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. अनेक वर्ष चाललेल्या आंदोलनामुळे १९८३ मध्ये अर्जेंटिनात लोकशाही आली. नवीन सरकारने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात यश आले. मात्र, २०१० मध्ये क्रिस्टिना फर्नांडिस यांच्या तत्कालीन सरकारने कर्जाची परतफेड करण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या राखीव निधीचा वापर करण्यास सुरुवात केली.त्यामुळे अर्जेंटिनाची अर्थव्यवस्था डबघाईला आली. त्यानंतर ही परिस्थिती आणखी बिकट झाली. सध्या अर्जेंटिनाची अवस्था पाकिस्तानपेक्षाही बिकट असून ५७.४ टक्के लोक गरिबीत जगत आहेत. २० वर्षांतील ती सर्वाधिक आहे.