अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका? चार आठवड्यांनी निर्णय येणार

नागपूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश आज नागपूर खंडपीठाने दिले. मात्र, यावर उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे आता गवळी तुरुंगातून सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारावर गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती.

अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले. मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात तसेच, इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top