अरबी समुद्रात कारवाई! ५०० किलो ड्रग जप्त

चेन्नई- भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदलासोबत संयुक्त कारवाई करत अरबी समुद्रातून ५०० किलो ड्रग्ज जप्त केले. दोन बोटींतून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज ‘क्रिस्टल मेथ’ असून दोन्ही बोटी, त्यातील लोक आणि ड्रग् श्रीलंका सरकारकडे सोपवण्यात आले.गेल्या काही दिवसांत देशात विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर ड्रग जप्त करण्यात आली आहेत. अंदमान आणि निकोबारमधील बॅरेन बेटावर तटरक्षक दलाच्या जवानांना एक संशयास्पद बोट दिसली. ड्रग तस्करांनी बोट पळवण्याचा प्रयत्न केला असता भारतीय तटरक्षक दलाने कारवाई करत बोट ताब्यात घेतली आणि ५५०० किलो ड्रग जप्त केले होते. अफगाणिस्ताननंतर म्यानमार अफूचा सर्वात मोठा उत्पादक आणि हेरॉइनचा पुरवठादार आहे. त्यामुळे म्यानमारमधून भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्य़ाचे उघडकीस आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top