लास वेगास – अमेरिकेतील लास वेगास मध्ये विमानतळावर लँडिंग करताना अचानक विमानाला आग लागली . सुदैवाने अग्निशमन दल आणि विमानतळ प्राधिकरणाला आग विझवण्यात तसेच प्रवाशांना विमानातून सुरक्षित उतरवण्यात यश आल्याने, विमानातील १९७ प्रवाशी बचावले . या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.फ्रंटीयरएअर लाईन्सचे १२३६ क्रमांकाचे विमान डियेगो येथून लास वेगासला आले . मात्र हॅरी रीड विमानतळावर लँडिंग करताना अचानक या विमानाला आग लागली . पण त्याही परिस्थितीत वैमानिकाने वेगावर नियंत्रण करून रनवेवर विमान थांबवले. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचार्यांनी धाव घेऊन प्रथम आग विझवली . विमानातील १९० प्रवासी आणि ७ क्रू मेंबर्स अशा १९७ जणांना सुरक्षित विमानातून उतरवण्यात आले . विशेष म्हणजे कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |