वॉशिंग्टन – अमेरिकेतून तृतीयपंथीय विकृती हटवण्यात येणार असून, अमेरिकेत यापुढे केवळ स्त्री व पुरुष अधिकृत लिंग असतील अशी घोषणा अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केली. महिलांच्या खेळांमध्ये पुरुषांना स्थान दिले जाणार नाही. तसेच लष्कर शाळांमधूनही तृतीयपंथीय ओळख असलेल्यांना काढून टाकण्याचे आदेश आपण देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या अॅरिझोनामधील तरुण परंपरावादींच्या एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी अनेक विषयांवर आपली बेधडक मते मांडली. ते म्हणाले की, मी लहान मुलांच्या लैंगिक विकृतीविरोधात आदेश काढणार असून, लष्कर व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून काढून टाकण्यात येणार आहे. स्थलांतरीत लोकांकडून होत असलेली गुन्हेगारी व अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याला प्राधान्य देणार आहे.
अमेरिकन राजकारणात तृतीयपंथीयांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. या मुद्यावरून डेमोक्रेटिक व रिपब्लिकन पक्षात विरोधी भूमिका आहे. गेल्या आठवड्यात सादर झालेल्या अमेरिकेच्या अर्थसंकल्पात तृतीयपंथीयांच्या निधीतही कपात करण्यात आली आहे. येत्या 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.