अमेरिका-ब्रिटनच्या हल्ल्यांना हुथींचा प्रत्युत्तराचा इशारा

वॉशिंग्टन

अमेरिका आणि ब्रिटनने काल संयुक्त कारवाई करत येमेनमधील हुथींच्या नियंत्रणाखालील १३ ठिकाणांना लक्ष्य केले. अमेरिका आणि ब्रिटनने केलेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा हुथींनी दिला.

अमेरिका आणि ब्रिटनने केलेल्या हल्ल्याला प्रत्यत्तराचा इशारा देत हुथींनी सांगितले की, ‘अमेरिका आणि ब्रिटनचया लष्करांनी काल येमेनमधील १३ तळांवरील एकूण ३६ लक्ष्यांवर हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर दिले जाईल. या हल्ल्यांमुळे पॅलेस्टानला असणारा पाठिंबा कमी होणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पॅलेस्टाईनला पाठिंबा देणार.

अमेरिका आणि ब्रिटनने केलेल्या संयुक्त कारवाई बाबत अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी काल एक निवेदन जारी करत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, येमेनमधील १३ तळांवर हुतींच्या एकूण ३६ लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. या तळांवर हुथींनी लपवून ठेवलेल्या शस्त्र साठवणुकीच्या जागा, क्षेपणास्त्र यंत्रणा व लाँचर, हवाई बचाव यंत्रणा आणि रडार अशा आधुनिक सामग्री आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिका व ब्रिटनसोबतच ऑस्ट्रेलिया, बहारिन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड्स व न्यूझीलंड हे देशही सहभागी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top