अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द

भंडारा
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे महत्त्वाचे नेते अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आला असून त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उद्या होणारी त्यांची जाहीर सभा पुढे ढकलण्यात आली आहे. या सभेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनंतर ही सभाच रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अमित शहा यांची प्रकृती बरी नसल्याने ते प्रवास करू शकत नाहीत त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी करण्यात आलेल्या विशेष प्रयत्नांची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी आज दुपारी २ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर दीड तासातच अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाल्यामुळे उद्याची सभाही रद्द करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top