अमरावतीत कार अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

अमरावती – अमरावतीत दर्यापूर-अकोला मार्गावर अपघात झाला असून दोन कारची समोर समोर धडक बसली. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
आनंद बाहकर (२६), बंटी बिजवे (३८), प्रतीक बोचे (३५) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर पप्पू घाणीवाले जखमी झाला आहे. दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल या पितापुत्रांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.