अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागा तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली.या बरोबरच शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दलचा पं. भीमसेन जोशी पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना तर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला असून रंगभूमीवरील कार्यासाठी प्रकाश बुद्धीसागर यांनाही पुरस्कार जाहीर झाला. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार शशिकला झुंबर सुक्रे यांना जाहीर झाला आहे. या बरोबरच विशाखा सुभेदार, डॉ. विकाश कशाळकर, सुदेश भोसले, लोककलाकार अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहीर राजेंद्र कांबळे, सोनिया परचुरे, रोहिणी हट्टंगडी, कितर्नकार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीतासाठी पांडुरंग मुखडे, कैलास मारुती सावंत तर आदिवासी कलेसाठी शिवराम शंकर धुटे यांनाही पुरस्कार घोषित झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top