अदानी समूह सौर ऊर्जा क्षेत्रात ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

मुंबई – अदानी समूह पुढील पाच वर्षांत पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात विविध राज्यांमध्ये सुमारे ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी यांनी ही माहिती दिली.सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि दोन्हींचा संगम असलेले हायब्रीड प्रकल्प अशा पर्यावरणस्नेही आणि पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या ऊर्जा स्त्रोतांवर अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी गुंतवणूक करणार आहे. एवढया मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारी अदानी ग्रीन ही देशातील बहुधा एकमेव खासगी कंपनी ठरणार आहे,असे सागर अदानी यांनी सांगितले.विकसित भारत -२०४७ या तरुण उद्योजकांच्या शिखर परिषदेत बोलताना सागर अदानी यांनी ही माहिती दिली. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात गुजरातच्या खावडा येथे ३० हजार मेगावॉटचा नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्प ऊभारून केली जाणार आहे,असे सागर अदानी यांनी सांगितले.या प्रकल्पामुळे अदानी ग्रीन ही कंपनी शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरेल,असा दावा सागर अदानी यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top