अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये शेअर्समध्ये मोठी तेजी, नक्की कारण काय?

Adani Group Shares: सोमवारच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज काहीशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये वाढ दिसून आली. मात्र, सर्वाधिक वृद्धी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली. ग्रुपचे सर्वच शेअर्स आज हिरव्या रंगात ट्रेड करताना पाहायला मिळाले. सर्वाधिक वाढ अदानी पॉवरच्या शेअरमध्ये दिसून आली, या शेअर्समध्ये दिवसभरात 18 टक्क्यांपेक्षा जास्त  वृद्धी दिसून आली. तर अदानी ग्रीन एनर्जीचा शेअरही 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला.

अदानी ग्रुपच्या (Adani Group Shares) शेअर्सची कामगिरी

अदानी पॉवरच्या (Adani Power Shares) शेअरने 18% पेक्षा जास्त वाढ नोंदवली. बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 532.95 रुपयांवर ट्रेड करत होता. अदानी ग्रीन आणि अदानी एनर्जी सोल्यूशन्सचे शेअर अनुक्रमे 1,002.85 रुपये आणि 773.55 रुपये रुपयांवर होते.

ग्रुपचे इतर शेअर्स जसे की, अदानी टोटल गॅसमध्ये 9%, NDTV मध्ये  9% आणि  अदानी एंटरप्रायझेसमध्ये 8.50% वृद्धी पाहायला मिळाली. याशिवाय, ACC, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंटने 4-5% ची वाढ नोंदवली.

अदानी ग्रुपच्या ग्रुपच्या (Adani Group Shares) शेअर्सने उसळी घेण्याचे कारण काय?

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आलेली ही तेजी मार्केटमधील सुधारणा आणि उच्च ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे दिसून आली. याशिवाय, ग्रुप व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. मात्र, तज्ञांकडून किरकोळ गुंतवणुकादारांना नव्याने यात गुंतवणूक करण्याविषयी सावध केले जात आहे.