मुंबई – अमेरिकेत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अदानी उद्योग समुहावर खटला दाखल झाल्याने काल अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर गडगडले होते. मात्र आज दुसऱ्याच दिवशी अदानी समुहातील बहुतांश कंपन्यांचे शेअर पुन्हा एकदा वधारले. तसेच माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात तुफान खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १९६१ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५५७ अंकांनी वधारला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांच्या शेअरमध्ये आज वाढ दिसून आली. केवळ एका कंपनीच्या शेअरमध्ये थोडीशी घसरण झाली. त्याचप्रमाणे निफ्टीमधील ५० कंपन्यांपैकी ४९ कंपन्यांचे शेअर वधारले. तर एका कंपनीचा शेअर घसरणीसह बंद झाला.