नवी दिल्ली – बांगलादेशमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतरही अदानी पॉवर कंपनी आपल्या झारखंडमधील सोळाशे मेगावॉटच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून बांगलादेशला केला जाणार वीजपुरवठा सुरूच ठेवणार आहे. कंपनीने काल ही माहिती दिली.केंद्र सरकारने याच महिन्यात वीजेच्या आयात-निर्यातीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा केली असून परदेशांना विकण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या वीजनिर्मिती केंद्रांना देशांतर्गत वीजपुरवठा करण्यास परवानगी दिली आहे.या सुधारणेनुसार अदानी पॉवरला देशांतर्गत वीज विक्री किंवा पुरवठा करण्याची परवानगी मिळू शकते. परंतु कंपनीने आपल्या झारखंडमधील गोड्डा प्रकल्पातून बांगलेदेशला केला जाणारा वीज पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
