नवी दिल्ली- उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि निव्वळ-शून्य लक्ष्यांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने अहमदाबादच्या काही भागांमध्ये घरांना स्वयंपाकासाठी पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूमध्ये ग्रीन हायड्रोजनचे मिश्रण करण्यास सुरुवात केली आहे.
अदानी टोटल गॅस लिमिटेड, फ्रेंच ऊर्जा कंपनी टोटल इंजिनिअर्स समूहाच्या शहर गॅस संयुक्त उपक्रमद्वारा अहमदाबादमधील शांतीग्राममध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जातो.या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यामध्ये ग्रीन हायड्रोजनचे २.२ ते – २.३ टक्के मिश्रण करण्यास सुरुवात केली आहे,असे फर्मने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.कंपनीने इलेक्ट्रॉलिसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन करण्यासाठी पवन किंवा सौर ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करून ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू केले आहे. हा वायू नैसर्गिक वायू मिश्रित आहे. तोच सध्या स्वयंपाकाच्या उद्देशाने घरांमध्ये पुरविला जातो.नैसर्गिक वायूमधील या ग्रीन हायड्रोजन मिश्रणाचे प्रमाण हळूहळू ५ टक्के आणि शेवटी ८ टक्क्यांपर्यंत वाढवले जाणार आहे.