पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये राज्यात नांदेड विभागातील सर्वाधिक ११ कारखान्यांचे तर पुणे विभागातील ८ कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.
विधानसभा निवडणुकांमुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम काहीसा विलंबाने सुरु झाला.यंदाच्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप परवाना घेणे अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत १७५ साखर कारखान्यांनी परवाना घेतला आहे.त्यात सहकारी ८३ साखर कारखाने तर खासगी ९२ साखर कारखान्यांचा समावेश आहे.त्यापैकी त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळप सुरु केले आहे.त्यात १९ सहकारी तर २६ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.४५ साखर कारखान्यांनी आतापर्यंत १० लाख ३५ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख २३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर साखर उतारा ६.०२ टक्के मिळाला आहे.