अकोल्यामध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अकोला- अकोट तालुक्यातील कावसा-कुटासा रस्त्यावर काल रात्री दोन दुचाकी आणि वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर ४ जण गंभीर जखमी झाले.या अपघातात अविनाश मांगीलाल चव्हाण याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत दिनेश चव्हाण,राहुल कास्तकार,लखन चव्हाण आणि शिवा पाटील हे चौघे गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.