९ मे पर्यंत जम्मूत पाऊस आणि वादळाची शक्यता

श्रीनगर –
जम्मू -काश्मीरला गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपले असून, हवामान विभागाकडून येत्या २४ तासांत आणखी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ९ मे नंतरही जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सोमवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊस सुरू असून, ढगाळ वातावरण होते. ९ मे नंतर मुख्यतः स्वच्छ हवामान अपेक्षित असले तरी, दुपारी किंवा संध्याकाळी काही ठिकाणी पावसासह वादळ येण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

१० ते १५ मे पर्यंत तापमानात वाढ होऊन हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना फळबागांवर फवारणी आणि पिकांची काढणी ९ मेपासून पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. हवामानानुसार उबदार कपडे आणि खाद्यपदार्थ तयार ठेवण्याचा सल्ला पर्यटकांना देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत सकाळी श्रीनगरमध्ये १.६ मिमी, काझीगुंड ४९.८ मिमी, पहलगाम १५.१ मिमी, कुपवाडा ८.२ मिमी, कुकरनाग ६२.२ मिमी, गुलमर्ग १०.८ मिमी, जम्मू २.७ मिमी, बनिहालमध्ये २.७ मिमी, बानिहलमध्ये २ मिमी, ४० मिमी पावसाची नोंद झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top