मालवण – अवघ्या ८ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्गनगरी पोलिस मुख्यालयासमोर घडली. दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्या वॅगनार कारने जोरदार धडक दिल्याने जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातातील मृत तरुणाचे नाव श्रीकृष्ण सावंत (३०) असे असून तो ओरोस खुर्द-डोंगरेवाडी येथील रहिवासी होता. त्याचे आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी पोलिस मुख्यालयासमोरील कोको हॉटेल पुढील वळणावर त्याच्या मोटारसायकलला समोरून येणार्या कारने धडक दिली होती.त्यात श्रीकृष्ण सावंत रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्याच्यावर बांबोळी-गोवा रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र काल सायंकाळी उशिरा उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी कारचालक विनय मंगेश आळवे (३०) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.