नंदुरबार- जिल्ह्यातील शहादा शहरात गेल्या ६ महिन्यांपासून सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे या शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उपकेंद्रावर वारंवार बिघाड होत असल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे स्पष्टीकरण वीज कंपनीने दिले आहे.
वीज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा गंभीर परिणाम वैद्यकीय क्षेत्रावर होत आहे.अनेक रुग्णालयातील महत्त्वाच्या शस्त्रक्रिया विजेअभावी रखडत चालल्या आहेत. परवा रविवारी तर शहरातील वीजपुरवठा तब्बल १० तास बंद राहिल्याने नागरिकांचे फार हाल झाले.सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू आहे. वातावरणातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.३३ केव्हीमध्ये बिघाड होत असल्याने गेल्या ६ महिन्यांपासून शहरातील वीजपुरवठा खंडित होत आहे.याबाबत वीज कंपनीकडे विचारणा केली असता केबल हे कारण सांगितले जात आहे.मात्र उपाययोजना काय आणि कधी करणार याबाबत कुणी काहीच सांगत नाही.त्यामुळे नागरिक त्रस्त आणि संतप्त झाले आहेत.