मुंबई- गणेशोत्सवाचे औचित्य साधत मध्य रेल्वेची वांद्रे- मडगाव एक्स्प्रेस ही द्विसाप्ताहिक ट्रेन ४ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे.
वसई,पनवेल करून कोकणात रेल्वे जाणार आहे.ही गाडी बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ६.५० वाजता वांद्रे येथून सुटेल आणि मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी
सकाळी ७.४० वाजता सुटेल. बोरिवली, वसई रोड,भिवंडी रोड, पनवेल,रोहा,वीर, चिपळूण,रत्नागिरी, कणकवली,सिंधुदुर्ग,
सावंवाडी रोड,थिविम आणि करमाळी आदी स्थानकांवर रेल्वे दोन्ही दिशेने थांबेल.या गाडीमध्ये एसी २ टायर,एसी ३ टायर,एसी ३ टायर , इकॉनॉमी,स्लीपर क्लास आणि साधारण द्वितीय श्रेणी डब्यांचा समावेश आहे.