हाँगझाऊ – चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने आज तिसरे सुवर्णपदक पटकावले. भारतीय संघाने २०९.२०५ गुणांची नोंद करीत तब्बल ४१ वर्षांनी घोडेस्वारीमध्ये सुवर्णपदक पटकावले. तर महिला नौकायन स्पर्धेत नेहा ठाकूरने रजत पदक मिळवले. नौकानयन (सेलिंग)मध्ये इबाद अलीने कांस्य पदक पटकावले. त्यामुळे भारताची पदकांची संख्या १४ झाली असून गुणतालिकेत भारत सातव्या क्रमांकावर आहे. यजमान चीनने ४८ सुवर्णपदकांसह ८४ पदके जिंकून तिसऱ्या दिवशीही गुणतालिकेतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. उजबेकिस्तानचा १६-० ने धुव्वा उडवणाऱ्या पुरुष हॉकी संघाने सिंगापूरलाही आज १६-० गोलने पराभूत करून आपला दबदबा कायम राखला आहे.
४१ वर्षांनी इतिहास घडला घोडेस्वारीत भारताला सुवर्ण
