४,०५० कोटींचा घोटाळा प्रकरण अ‍ॅमवे इंडियाची ईडी चौकशी सुरू

हैदराबाद :

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अ‍ॅमवे इंडिया या डायरेक्ट सेलिंग फर्मवर मोठी कारवाई केली आहे. कंपनीविरुद्ध हैदराबादच्या विशेष न्यायालयात ४,०५० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती. तेलंगणा पोलिसांकडे यापूर्वीही कंपनीविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कंपनीच्या संचालकांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी चौकशी करत आहे.

ईडीने अ‍ॅमवे इंडियावर असा आरोप केला आहे की, कंपनीने मनी सर्क्युलेशन स्कीमचा प्रचार बेकायदेशीर प्रचार केला. ही योजना पिरॅमिड योजना असल्याचे तपासात स्पष्ट झाले. ज्यामध्ये वरच्या श्रेणीत असलेल्या लोकांना मोठा फायदा होतो. कंपनी मालविक्रीच्या नावाखाली नावनोंदणी करून जास्त कमिशनचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या योजनेत जितके नवीन सदस्य सामील होतील, तितके वरच्या लोकांना अधिक कमिशन मिळते.

केवळ ‘मनी सर्क्युलेशन स्कीम’द्वारे अ‍ॅमवेने ४०५०.२१ कोटी रुपये कमावल्याचेही तपासात उघड झाले. एवढेच नाही तर परदेशात बसलेल्या गुंतवणूकदारांना कंपनीने २,८५९ कोटी रुपये पाठवले. त्यानंतर ही कंपनी ईडीच्या रडारवर आली. या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. ७५७.७७ कोटी रुपयांची किंमत असलेल्या कंपनीच्या मालमत्तेचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, ईडीने सुरू केलेल्या कारवाईनंतर कंपनीने स्पष्टीकरण दिले की, हे प्रकरण २०११ च्या तक्रारीशी संबंधित आहे. कंपनी या प्रकरणाच्या तपासात ईडीला पूर्ण सहकार्य करत आहे आणि तपास यंत्रणेने मागवलेले तपशीलही देत ​​आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top