२ मे रोजी विमानतळ
सहा तासांसाठी बंद

मुंबई : मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्टी २ मे रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई विमानतळ सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत बंद राहील. यासंदर्भात एअरमनला नोटीस जारी करण्यात आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन क्रॉसिंग रनवे आहेत. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार आहेत.

प्रवाशांची सुरक्षा पाहता हे मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टी २ मे रोजी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद राहील. दरम्यान, या संदर्भात एक एअरमनला नोटीस आधीच जारी करण्यात आली असून, आहे. देखभालीच्या कामानंतर, २ मे पासून संध्याकाळी ५:०० वाजल्यापासून मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे

Scroll to Top