भारतात दिसणार नाही
मुंबई – यंदाच्या वर्षांतील पहिले सूर्यग्रहण या महिन्यात गुरुवारी २० एप्रिल रोजी होणार आहे. तब्बल १०० वर्षांनी दिसणारे हे ‘हायब्रिड सूर्यग्रहण’ असेल. कारण एकाच दिवशी या सूर्यग्रहणाचे ३ प्रकार दिसणार आहेत. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
या हायब्रिड सूर्यग्रहणाला निंगालू किंवा शंकर सूर्यग्रहण असेही म्हटले जाते. हायब्रिड म्हणजे आंशिक (खंडग्रास), संपूर्ण (खग्रास) आणि कंकणाकृती अशा तीन स्वरूपात हे सूर्यग्रहण दिसेल. हे ग्रहण सकाळी ७.४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२.२९ वाजता सुटेल. हे ग्रहण आशियातल्या काही देशांसह ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिका येथून दिसेल. ते भारतात दिसणार नाही. यंदा वर्षभरात ४ ग्रहणे दिसणार आहेत.