मुंबई – महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दहशतवाडी हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दिवशी हा हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी पार्कवर आयोजित परेड दरम्यान हा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. गुप्तचर विभागाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.शिवाजी पार्क परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
शिवाजी पार्कमध्ये आयोजित परेड दरम्यान दहशतवादी हल्ला होऊ शकतो. जर हा हल्ला झाला तर मोठ्या प्रमाणात लोक मारले जाऊ शकतात. सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तेचेही नुकसान होऊ शकते. १ मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर परेड होणार आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाण आणि तारीख निवडली आहे.दहशतवादी हल्ल्याच्या कटामुळे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर शिवाजी पार्कचा परिसर नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. मुंबई पोलीस विभागाची पथकेही पूर्णपणे सतर्क झाली आहेत. तेथून जाणाऱ्या प्रत्येक संशयित व्यक्तीची चौकशी केली जात आहे.