पंढरपूर – पंढरीतील विठ्ठल-रखुमाईची नित्यपूजा,पाद्यपूजा,तुळशी पूजा,चंदन उटी पूजा मंदिर समितीकडून उपलब्ध असते.मात्र आता काही देश विदेशातील भाविकांसाठी मंदिर समितीने देवाच्या पूजेबाबत ‘ऑनलाईन बुकिंग’ची सोय उपलब्ध करून दिली आहे.येत्या १ ऑक्टोबरपासून या पूजेसाठी संबंधित संकेतस्थळावरून नोंद करता येणार आहे,अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.
विठ्ठल रखुमाईच्या विविध प्रकारची पूजा आता घरबसल्या आपल्याला पाहिजे त्यादिवशी करता येऊ शकते. यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. पूजेच्या नोंदणीसाठी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार आहे. या संकेतस्थळावर तारीख वार, तिथी दिसणार आहे.त्यानुसार नोंदणी करता येणार आहे. १ ऑक्टोबरपासून ही नोंदणी सुरू होणार असली तरी लगेच भाविकांना पूजेसाठी येता येणार नाही,म्हणून ७ ऑक्टोबरपासूनच्या पूजेची नोंदणी करता येणार आहे. तसेच गर्दीच्या दिवशी या ऑनलाइन पूजा बंद राहतील,अशी माहिती शेळके यांनी दिली आहे