मुंबई – सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक गाड्यांना मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी आता रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. याअंतर्गत आता पुणे-इंदूर ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.
पुणे-इंदूर ही साप्ताहिक गाडी असून तिच्या १४ फेऱ्या होणार आहेत.पुणे स्थानकावरून ही गाडी १९ मे ते ३० जून या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पुण्यातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी इंदूरला पोहोचेल. इंदोरमधून ही गाडी १८ मे ते २९ जून या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी इंदूरमधून दर गुरूवारी सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ३ वाजून १० मिनिटांनी पुण्यात पोहचेल.
या गाड्यांना लोणावळा, कल्याण,वसई रोड,वापी, वलसाड,सूरत,वडोदरा, गोधरा,रतलाम,नागदा, उज्जैन,देवास असे थांबे राहणार आहे.या गाड्यांमध्ये एक प्रथम वातानुकूलित डबे,दोन तृतीय वातानुकूलित डबे,१२ शयनयान,दोन गार्डस,ब्रेक व्हॅनसह सहा जनरल द्वितीय श्रेणी डब्यांचा समावेश करण्यात आला आहे.