Home / News / १८, १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी नाही

१८, १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी नाही

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी असेल असे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी असेल असे सांगितले जात होते. मात्र ते वृत्त चुकीचे असून राज्य सरकारने सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली असेल त्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यपकांनी आपल्या अधिकारात घ्यावा. १८ आणि १९ रोजी सर्व शाळा सुरू राहतील. त्यांना सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या