- ७४ कोटींची शिष्यवृत्ती मिळाली
बॅडन रुज – अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा दिसून येते. हायस्कूल ते पदवीपर्यंतचा शिक्षणाचा काळ तर विद्यार्थ्यांना डोईजड वाटतो.अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या किंवा पालकांच्या आवडीचे कॉलेज हवे असते. मात्र लुईसाना देशातील डेनिस मलिक बार्न्स नावाचा विद्यार्थी मात्र जगातील भाग्यवान विद्यार्थी ठरला आहे.कारण अवघ्या १६ वर्षांच्या डेनिस बार्न्सला जगातील तब्बल १७० कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.तसेच त्याला ९ मिलियन डॉलर म्हणजे ७० कोटींची शिष्यवृत्तीही मिळाली आहे.
बार्न्स ४.९८ च्या सीजीपीए सह दोन वर्षे लवकर पदवीधर होत आहे. बार्न्सने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कॉलेज प्रवेशासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. सीएनएनला मुलाखत देताना तो म्हणाला, मी जवळपास २०० कॉलेजमध्ये अर्ज केला. मला १७० कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर माझ्या शाळेच्या प्रशासकांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला. कारण जगभरातील १७० कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून मी नवा विक्रम केला होता.