१६ भारतीय मच्छिमारांना
श्रीलंका नौदलाकडून अटक

रामेश्वरम – सागरी सीमेचे उल्लंघन करून मासेमारी करत असताना श्रीलंका नौदलाच्या जवानांनी १६ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडील दोन ट्रॉलर बोटी आणि मासेमारीचे साहित्य जप्त केले आहे.भारतीय मच्छिमार संघटनेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजपचे तामिळनाडू प्रमुख अन्नामलाई यांनी या मच्छिमारांच्या सुटकेसाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवले आहे.

श्रीलंका नौदलाने सांगितले की, श्रीलंकेच्या समुद्र हद्दीत अवैध मासेमारी करणार्‍यांविरुद्ध विशेष मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम सुरू असताना १६ भारतीय मच्छिमार सागरी हद्दीचे उल्लंघन करून मासेमारी करत असताना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर अटक कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईचा पीएमकेचे नेते एस.रामदास यांनी निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, असा प्रकार श्रीलंकेकडून वारंवार घडत आहे. यात मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असते. एक बोट जरी जप्त केली तरी १०० सदस्य असलेल्या किमान २० कुटुंबांना त्याचा फटका बसतो.

Scroll to Top