१६२ हेल्मेट उत्पादक कंपन्यांचे परवाने सरकारकडून रद्द

नवी दिल्ली-रस्ता सुरक्षेबाबत केंद्र सरकारकडून वेगळी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांच्या हेल्मेटचाही समावेश करण्यात आला आहे.विशेष म्हणजे सरकारने हेल्मेट बनवणाऱ्या १६२ कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत.ही मोहीम सरकारने केलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

सरकारकडून आणखी विविध योजना आखल्या जात आहेत. रस्ते सुरक्षा आणि बाजारात निकृष्ट संरक्षक उपकरणांचा पूर आल्याने केंद्राने जिल्हा अधिकाऱ्यांना गैर आयएसआय प्रमाणित हेल्मेट बनवणाऱ्या आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, सरकारने आतापर्यंत १६२ हेल्मेट उत्पादकांचे परवाने रद्द केले आहेत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच बीआयएसच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना लक्ष्य करून अधिकाऱ्यांनी २७ ठिकाणी छापे टाकले आहेत. ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे म्हणाल्या की, हेल्मेटमुळे जीव वाचतो, पण ते चांगल्या दर्जाचे असायला हवेत. बाजारातून असुरक्षित हेल्मेट हटवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जून, २०२१ मध्ये गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केल्यानंतर मानक आयएस ४१५१:२०१५ अंतर्गत सर्व हेल्मेटसाठी बीआयएस प्रमाणन अनिवार्य केल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top