१५ वर्षांवरील केवळ सरकारी
वाहनेच भंगारात काढली जाणार

*परिवहन विभागाने दिले स्पष्टीकरण

मुंबई – राज्यात १ एप्रिलपासून स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत १५ वर्षांवरील वाहने भंगारात काढली जाणार आहेत.मात्र हा शासन आदेश केवळ सरकारी वाहनांसाठी लागु असणार आहे.खासगी वाहनांना तो लागु होणार नाही, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

खरे तर १५ वर्षांवरील वाहने स्क्रॅप केली जाणार असल्याच्या शासन आदेशात ठोस स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे वाहनधारकांमध्ये आणि वाहन विक्रेत्यांमध्ये चुकीचा अर्थ लावला जात आहे.त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. काहीजण आपापली १५ वर्षे जुनी विकु लागले आहेत. पण काही जणांची वाहने १५ वर्षे होऊनही सुस्थितीत आहेत. मग अशा वाहनांचे काय करायचे.तसेच हे वाहन जरी विकले तरी नवीन वाहन घेणे अनेकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे सर्वच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.खरे तर १५ वर्षे जुन्या झालेल्या वाहनांच्या सुस्थितीची चाचणी करून संबंधित वाहनांना पुढे वापरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार आहे.पण अशातच परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे की,सरकारच्या मूळ आदेशात केवळ १५ वर्षे वापरलेली सरकारी वाहने स्क्रॅपमध्ये काढावीत,असा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे हा आदेश खासगी मालकीच्या वाहनांना लागु होत नसल्याचे परिवहन विभागाने म्हटले आहे.

Scroll to Top