१५ जूनपर्यंत मुंबईतील खड्डे बुजवा! अतिरिक्त पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई – यंदा मुंबईतील रस्त्यांवर २ लाख १० हजार चौरस मीटरचे खड्डे असून खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने २४ वार्डसाठी ८४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे येत्या १५ जूनपर्यंत एक महिन्यात सर्व खड्डे बुजविण्यात यावेत, असे आदेश पालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी संबंधित खात्याचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व अभियंते यांना दिले आहेत. महापालिका दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते.विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करते.मात्र खड्ड्यांची समस्या दरवर्षी उद्भवत असते. पालिका दरवर्षी ३१ मे पूर्वी म्हणजे पावसाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आवश्यक असते. यंदा पलिकेने खड्डे बुजविण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, २४ वार्डात खड्डे बुजविण्यासाठी यंदा ‘री अँक्टीव्ह अस्फाल्ट रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
यंदा शहर विभागातील खड्डे बुजविण्यासाठी २७ कोटी रुपये,पश्चिम उपनगरातील खड्डे बुजविण्यासाठी ३९ कोटी रुपये तर पूर्व उपनगरातील खड्डे बुजविण्यासाठी १८ कोटी रुपये असे एकूण ८४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top