१४ जूनपर्यंत आधारकार्ड
मोफत अपडेट करता येणार

मुंबई

आधारकार्ड अपडेट प्रक्रिया काही काळासाठी मोफत करण्यात आली आहे. ही मोफत सेवा १४ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. या काळात १० वर्ष जुने आधार कार्ड असणाऱ्यांना ते अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) याची माहिती दिली. हे आधारकार्ड अपडेट केवळ ऑनलाईन पोर्टलवर करता येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही. मात्र, हेच काम करण्यासाठी आधार केंद्रावर गेले असता ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आधार कार्ड विनाशुल्क ऑनलाइन अपडेट करण्याचा युआयडीएआयचा निर्णय हा लोककेंद्रित पाऊल आहे. याचा लाखो लोकांना फायदा होईल. पुढील तीन महिन्यांसाठी (१५ मार्च ते १४ जून २०२३ पर्यंत) ही मोफत सेवा उपलब्ध आहे, असे युआयडीएआयने म्हटले.

Scroll to Top