१४ जानेवारीला कोकण विभागातील पेन्शन अदालत

नवी मुंबई – सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्यांच्या पेन्शनच्या समस्या सोडवण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी पेन्शन अदालत आयोजित करण्यात येते. या महिन्यातील विभागीय पेन्शन अदालत मंगळवारी १४ जानेवारीला सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोकण भवनातील कक्ष क्रमांक १०६ येथे आयोजित करण्यात आली आहे. या पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास त्याच दिवशी त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील. कोकण विभागातील पेन्शनधारकांनी या अदालतीला उपस्थित राहून पेन्शनविषयी आपले प्रश्न उपस्थित करावेत, असे कोकण विभाग तहसीलदार महेंद्र बेलदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top